क्राईम ब्लास्ट ब्यूरो
घरकुल बांधणीसाठी धनादेश काढून देण्याच्या मोबदल्यात साडेसात हजारांची लाच घेताना साक्री पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 17 ऑगस्टला ही कारवाई करण्यात आली.
वैभव हिंमत हालोरे असे लाचखोर अभियंत्याचे नाव असून तो साक्री पंचायत समितीच्या ग्रामीण गृह निर्माण विभागात वर्ग तीन पदावर कंत्राटी अभियंता म्हणून कार्यरत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, तक्रारदार यांचे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२१ – २०२२ मध्ये नागपूर (ता.साक्री) गावात घरकुल मंजुर झालेले होते. सदर घरकुलाचे फोटो काढून नजरी तपासणी करुन त्यांचे मुल्यांकन पंचायत समिती कार्यालयात सादर करुन धनादेश काढुन दिल्याच्या मोबदल्यात वैभव हालोरे याने साडेसात हजारांची लाच मागितली होती. त्यामुळे संबंधिताने एसीबीकडे तक्रार केली. तक्रारीच्या पडताळणीत वैभव हालोरे याला पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व राजन कदम, भुषण खलाणेकर, प्रशांत बागुल, भुषण शेटे, सुधीर मोरे, संतोष पावरा, शरद काटके, कैलास जोहरे, संदिप कदम, रामदास बारेला, गायत्री पाटील, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, जगदिश बडगुजर यांनी ही कारवाई केली.