क्राईम ब्लास्ट ब्यूरो
धुळे बसडेपोत उभ्या बसमध्ये गळफास लावून ड्रायव्हरने आत्महत्या केली. ही घटना 6 ऑगस्टला रात्री घडली.
मृत ड्रायव्हरचे नाव हिरामण नथा देवरे (वय 57) असून तो पुणे येथील रहिवासी आहे. 6 ऑगस्टला सायंकाळी तो पुणे-धुळे बस घेऊन धुळे डेपोत पोहचला. त्याने व कंडक्टरने सोबत जेवण घेतले. रात्री कंडक्टर रेस्ट रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेला. देवरे मात्र बसमध्ये झोपला. रात्री साडेदहानंतर त्याचा गळफास लावलेला मृतदेह आढळला. बसची घंटी वाजवण्यासाठी बांधलेली दोरी त्याने गळफास लावण्यासाठी वापरल्याचे आढळले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.