हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कुमार नगरमध्ये चंदनला तिघांनी उडवले

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

धुळे शहरातील कुमार नगर परिसर शनिवारी मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजाने थरारून निघाला. तेथील चंदन तथा चिनू पोपली या युवकाला धरून ठेऊन त्याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला.

जुगारात पैशांच्या उसनवारीवरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संशयित भटू चौधरी, त्याचा शालक व यासिन पठाण असे तिघे रात्री चंदनच्या घरी गेले होते. मात्र तो घरी नव्हता. त्यामुळे ते परत गेले. मध्यरात्री घरी परत येत असलेल्या चंदनला त्यांनी चौकात गाठले. भटू चौधरी व त्याच्या शालकाने चंदनला धरून ठेवले तर यासिन पठाणने त्याच्यावर गोळी झाडली. वर्मी गोळी लागल्याने तो खाली कोसळला. नागरिकांनी चंदनला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पवन गुंडीयाल याने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भटू चौधरी व यासीन यांना अटक केली. जुगाराच्या पैशातून झालेला वाद आणि त्यानंतर चंदनने पोलिसांत दिलेली तक्रार यावरून हा खून झाल्याचा संशय आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!