हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गव्हाणे फाट्याजवळ अपघात, पाच ठार

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शहरात कानुबाईच्या उत्सवाला हजेरी लावून नाशिककडे परत जात असताना कार-ट्रॅक्टरच्या धडकेमुळे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर शहरातील रहिवासी दशरथ तथा नाना कोळी यांच्याकडे कानुबाईचा उत्सव आयोजित केला होता. त्याला हजर राहण्यासाठी त्यांनी बहीण मीना चव्हाण व मेहुणे संदीप चव्हाण यांना आग्रहाने शिरपूरला बोलावले. चव्हाण कुटुंबासह त्यांचा मित्र हितेश चौधरी देखील शिरपूरला आले. एक ऑगस्टला कानुबाईचे विसर्जन केल्यानंतर सर्वजण नाशिकला परत जाण्यासाठी निघाले. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गव्हाणे फाट्याजवळ त्यांच्या  कारणे उभ्या ट्रॅक्टरला भरधाव वेगात धडक दिली. या अपघातात संदीप शिवाजी चव्हाण, मीना संदीप चव्हाण व हितेश चौधरी ठार झाले. त्यांची मुलगी जान्हवी हिचा धुळे येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. महामार्गाच्या दुरुस्तीचे काम करणारा पांडुरंग माळी हा सोनगीर येथील मजूरही अपघातात ठार झाला. कारने धडक दिलेले ट्रॅक्टर महामार्ग दुरुस्तीसाठी मजुरांना घेऊन आले असल्याचे कळते.

अपघाताचे दृश्य भयंकर होते कारच्या एअरबॅग उघडून देखील संबंधितांचा जीव वाचू शकला नाही. जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे यांनी स्वतःच्या कारमधून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील मृत चव्हाण दांपत्य नाशिक येथील उत्तम नगरमध्ये राहते तर मयत हितेश चौधरी म्हसरूळ येथील रहिवासी आहेत.

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!