हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर, चाकूने भोसकले

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिकवणीच्या वर्गात  धक्का लागल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यामुळे नागरिक भयभीत झाले. एकाच्या कमरेत चाकू खुपसला तर दुसऱ्याच्या डोक्यात फरशी घालून गंभीर जखमी करण्यात आले. शहराला झालंय तरी काय आणि पोलिस काय करताहेत असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

साईम अकिल पिंजारी (१८) व त्याचा भाऊ अर्शद हे पोलिस मुख्यालयासमोर असलेल्या क्लासमध्ये शिकतात. त्यांच्यासोबत शिकणाऱ्या आदित्य खडके याच्याशी धक्का लागल्याच्या कारणावरून पिंजारी बंधूंचा वाद झाला. वाद वाढत जाऊन दोघांनीही आपापल्या मित्रांचे टोळके बोलावून घेतले. क्लास सुटताच दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यात खडके गटातील एकाच्या कमरेत चाकू खुपसण्यात आला तर पिंजारी याच्या गटातील एकाच्या डोक्यात फरशी टाकली. या घटनेनंतर जळगाव शहरात खुनाची अफवा पसरली होती. पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू करून काहींना अटक केली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!