क्राईम ब्लास्ट ब्यूरो
जावयासोबत गप्पा मारणाऱ्या महिलेस मारहाण करून तिच्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या पुरुषाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संबंधीत महिला किराणा दुकानदार असून चुडामन नगर येथे राहते. गावातील गोटू त्र्यंबक अहिरे याचा जावई 25 जुलैला रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान तिच्या दुकानावर जाऊन गप्पा मारत होता. त्याचा राग येऊन संशयित गोटू अहिरे याने तिला मारहाण केली. तिच्या पतीलाही झोडपले. या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी रघुनाथ शिलवान पोहचला. तो गोटूला समजूत घालून घराकडे जात असतांना गोटूने महिलेकडे पाहून पॅन्ट खाली करून अश्लील हावभाव केले. पुरमेपाडा (ता.धुळे) येथील या घटनेबाबत धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वाय.एन.सोनार तपास करीत आहेत.