क्राईम ब्लास्ट ब्यूरो
कॅन्सर झाला, त्याचे ऑपरेशनही केले पण तो शरीरातून निघालाच नाही असे निदान झाले आणि शिक्षकाने मग मरण जवळ केले.
ही हृदयद्रावक घटना साक्री तालुक्यात घडली. छोटू झिपरू पवार या 50 वर्षीय शिक्षकाने विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.
साक्री तालुक्यात चिंचपाडा हे पवार यांचे मूळ गाव. ते पांगणी (ता.साक्री) येथे आश्रमशाळेत शिक्षक होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना जिभेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. उपचार घेतल्यानंतर चार महिन्यांपूर्वी जिभेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काहीकाळ बरेही वाटले. मात्र लगेचच मानेत गाठी दिसून आल्या. त्या तपासल्यावर कॅन्सर पसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे पवार खचले. त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. शेतात विहिरीत उडी टाकून त्यांनी आत्महत्या केली. राजेंद्र पवार यांनी दिलेल्या महितीवरून पिंपळनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.