हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

एमपी ची पिस्तुले दहिवदमार्गे कुठे निघाली ?

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मध्यप्रदेशातून नाशिक जिल्ह्यात गावठी बनावटीच्या पिस्तुलांची व काढतुसांची तस्करी करताना सांगवी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून तीन पिस्तुले, नऊ जिवंत काडतुसे  आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

16 जुलैला सायंकाळी सुमारास सपोनि सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील वरला गावाकडुन दोन संशयित पल्सर मोटार सायकलवरून येत असुन त्यांच्याकडे पिस्टल व जिवंत काडतुस आहेत.  सुरेश शिरसाठ यांनी पीएसआय भिकाजी पाटील, संदीप पाटील नाकाबंदी करुन कारवाईचे आदेश दिले.  त्यांच्यासह हवालदार आरीफ रमजान पठाण, संदीप चंद्रकांत शिंदे,  योगेश बाळकृष्ण मोरे,  जयेश संजय मोरे, संतोष शिवाजी पाटील, इसरार  फारुकी आदींनी सापळा रचला. दहिवद गावाजवळ नाकाबंदी करून वाहने तपासत असतांना संशयितांनी पोलिसांना होऊन रस्ता बदलून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. संशयितांमध्ये प्रशांत शशिकांत अहिरे  (वय 27 रा. टाकळी रोड, रामदास स्वामी नगर नाशिक), व प्रफुल भानुदास जगताप वय 22 रा. हिसवड बुद्रुक ता. नांदगांव जिल्हा नाशिक) यांचा समावेश आहे. त्यांच्या  गावठी बनावटीचे तीन पिस्टल व 9 जिवंत काडतुसे आढळली. एकूण एक लाख 76 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या कारवाई बद्दल पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील अप्पर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सांगवी पोलिसांचे कौतुक केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!