क्राईम ब्लास्ट ब्यूरो
इंदोरकडून अमळनेरला जाणारी बस (एमएच 40, एन 9840) 18 जुलैला सकाळी मध्यप्रदेशातील खलघाट येथे पुलावरून नर्मदा नदीत कोसळली. दुपारपर्यंत 13 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून बचावकार्य अद्यापही सुरू आहे.
बचाव कार्याचा व्हिडीओ बघा !
दरम्यान अपघातानंतर धुळे जिल्हाधिकारी आणि प्रशासन खरगोन व धार येथील जिल्हा प्रशासनाच्या नियमित संपर्कात आहेत. ज्यांचे नातेवाईक बसमध्ये असतील त्यांनी ओळखपत्रासह नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांनी केले आहे.
हेल्पलाईन नंबर
जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष
(02562) 288066
शिरपूर तहसील नियंत्रण कक्ष (02563) 255043
नायब तहसीलदार पेंढारकर 9067790191
जितेंद्र सोनवणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, धुळे 8698862890