हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

सांगवीला तीन दिवसांत चौथा बळी !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई आग्रा हायवेवर सांगवी गावाजवळ रस्ता ओलांडताना एकाला 22 जूनला सकाळी कंटेनरने धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. तीन दिवसांत  चार जणांचे अपघाती बळी गेल्यामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. या उद्रेकानंतर धुळे पळासनेर टोलवे कंपनीला जाग येऊन सांगवी गावाजवळ मोठा स्पीडब्रेकर टाकण्यात आला.

मध्यप्रदेशातील रहिवासी असलेला पठाण जमऱ्या (45) हा रस्ता ओलांडत असतांना त्याला कंटेनरने धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला. तीन दिवसांत चौथा बळी गेल्याने ग्रामस्थांनी तासभर रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. डीवायएसपी अनिल माने, एपीआय सुरेश शिरसाट यांनी त्यांची समजूत घातली. त्यानंतर टोलवे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळाजवळ मोठा स्पीड ब्रेकर तयार केला. यापूर्वी तेथे दोन दुचाकीस्वार व एक पादचारी अपघातात ठार झाले आहेत. 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!