दिनांक 18/06/2022 रोजी रात्रौ 08.00 वा. ते रात्रौ 11.00 वाजे दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत एकुण 20 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान एकुण 552 चारचाकी व दुचाकी मोटरसायकल चालकांची तपासणी केली असता, त्यात 59 वाहन चालकांनी मद्यप्राशन केलेले असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे-10, उपनगर पोलीस ठाणे येथे-04, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे-04, नवापुर पोलीस ठाणे येथे-11, विसरवाडी पोलीस ठाणे येथे-06, शहादा पोलीस ठाणे येथे-04, धडगांव पोलीस ठाणे येथे-03, म्हसावद, सारंगखेडा, अक्कलकुवा, तळोदा पोलीस ठाणे येथे प्रत्येकी 02 गुन्हे, मोलगी पोलीस ठाणे येथे-03, शहर वाहतुक शाखेमार्फत 06 गुन्हे असे एकुण 59 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले.
दिनांक 18/06/2022 रोजी रात्रौ 08.00 वा. ते रात्रौ 11.00 वाजे दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत दारु पिऊन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव मा.उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल व भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
नाकाबंदीसाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय पवार, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, शहादा श्री. श्रीकांत घुमरे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकुवा श्री. संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांचेसह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व 15 दुय्यम अधिकारी तसेच 107 पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई भविष्यातही अशीच सुरु राहील असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्री. पी.आर.पाटील यांनी सांगितले.