हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आता बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवर समिती 

क्राईम ब्लास्ट ब्यूरो 
 
धुळे  जिल्ह्यातून बालविवाह निर्मूलनासाठी बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत आराखडा तयार करावा. पालकांचे समुपदेशन करावे आणि ग्राम बाल संरक्षण समिती गावागावांत गठित करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जिल्हा परिषदेत बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंमबलजावणीसाठी नुकताच आढावा घेतला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे, शिक्षणाधिकारी मोहन देसले (माध्यमिक), राकेश साळुंखे (प्राथमिक), प्र. परिविक्षा अधिकारी राकेश नेरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण, आरोग्य, यूनिसेफ एस. बी. सी. चे प्रतिनिधी, बालविवाह निर्मूलन प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प समन्वयक नंदू जाधव, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन आदी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मूलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ व सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिव्हेवियर चेंज कम्युनिकेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागांची भूमिका, बालविवाह निर्मूलनासाठी करावयाचे नियोजन यावर चर्चा झाली. त्यानुसार अंमलबजावणीसाठी पाच विभागांचा समावेश असलेला कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभाग यांचा समावेश असेल.

बालविवाहाच्या निर्मूलनासाठी मुलींपेक्षा मुलांमध्ये जनजागृती करावी. शिक्षण विभागाने यंदाच्या वर्षी दहावी अनुत्तीर्ण मुलींची यादी तयार करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करावेत. आश्रमशाळा व निवासी शाळांवर लक्ष केंद्रीत करून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये बालविवाहाबाबत निकष लावणे आवश्यक आहे. शाळा- शाळांमध्ये बालविवाहाचे दुष्परिणाम याविषयावर निबंध, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करावे. बालविवाहाचे दुष्परिणाम याविषयावर लघुपट तयार करून शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, पंचायत व आरोग्य विभागातर्फे माता- पालक बैठक, किशोरी मेळाव्यातून विद्यार्थ्यांना दाखवावेत, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सांगितले. 
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!