हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भाटपुर्‍याच्या म्हातार्‍याला कोण चावलं ?

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वृद्धाला महिलांनी चावा घेऊन मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात घडली. जखमी पुरुषाने दिलेल्या फिर्यादीवरुन दोन्ही महिलांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत गणेश गोविंदा जाधव (वय 62 वर्ष) यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, 14 जूनला दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या घरासमोर रेखाबाई जाधव व तिचा पती रमेश जाधव यांच्यात भांडण सुरु होते. ते सोडवण्यासाठी गणेश जाधव गेले. त्याचा राग आल्याने संशयित रेखाबाई रमेश जाधव हिने त्यांच्या डोक्यात काठी हाणली. त्यांच्या गुडघ्यावरही मारहाण केली. तेव्हढ्यावर न थांबता त्यांच्या डाव्या हाताला चावा घेतला. दुसरी संशयित सतीबाई प्रेमराज जाधव हिनेही त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. दोन्ही हिलांविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात भादंवि 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक रामोळे तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!