क्राईम ब्लास्ट ब्यूरो
अत्यंत आरामदायक आणि सुविधायुक्त वाहन अशी ख्याती असलेल्या महिंद्रा कंपनीच्या झायलो वाहनातून चक्क गुरांची तस्करी केल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेक पोस्टवर उघडकीस आला. मध्यप्रदेशातील महाभागाने हा अचाट पराक्रम शक्य करून दाखवला.
महिंद्रा झायलो कारमधून करताना सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई 15 जूनला मध्यरात्री करण्यात आली.
सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना कारमधून गुरांची वाहतूक होणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. मध्यरात्री पावणेदोनला महिंद्रा कंपनीची झायलो कार (एमपी 04, टीए 1518) ला संशयावरून थांबवून तपासणी केली असता मागील भागातील सीट काढून टाकून तेथे चार गाई कोंबल्याचे आढळले. या कारवाईत एकूण दोन लाख 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक विक्रम बालाराम चव्हाण (वय 40, रा. महू जि.इंदोर,मध्य प्रदेश) याला अटक करण्यात आली. गाईंची सुटका करून गोशाळेत पाठवण्यात आल्या.