हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

इंजिनीअरचा नादच खुळा, 25 बैलगाड्यातून नेलं वऱ्हाड

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

नवरदेवाच्या मनात आलं…आपली वरात हट के निघाली पाहिजे…मग एकेक आयडिया काढत गेला..शेवटी ठरलं एकदाचं ! आणि लोकांनी पाहिलं…

25 बैलगाड्यांवर जाणारं वऱ्हाड !!!

स्वतः बैल हाकलत नेणारा नवरदेव काही साधासुधा नव्हता. तो होता चक्क सिव्हिल इंजिनीअर आणि त्याची वधूही इंजिनीअर होती. आशिष तानाजी यमगर असं त्या पठ्ठ्याच नाव ! सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यातील चोरोची हे त्याचं गाव आहे. त्याचा विवाह नागोळ गावाच्या आशाराणी संजय मासोळ हिच्याशी ठरला. ती ही सिव्हिल इंजिनीअर आहे.

चोरोची गावापासून 10  किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगल कार्यालयात हा विवाह झाला. त्यासाठी घरापासून 25 बैलगाड्यातून वऱ्हाड गेलं. विशेष म्हणजे नवरदेव आशिष स्वतः एका गाडीला जुंपलेली बैलजोडी हाकलत होता. हे अनोखे वऱ्हाड पाहण्यासाठी ग्रामस्थांनी दुतर्फा गर्दी केली होती. बैलगाडीवरच वऱ्हाड पाहून जुने जाणते लोक स्वतःच्या भूतकाळात हरवले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!