सावेरजवळ ट्रक उलटून भीषण आग; वाहतूक ठप्प  //  पिक विमा योजनेचा लाभ घ्या; शेतकऱ्यांना आमदार पटेल-पावरा यांचे आवाहन  //  शिंगावे येथे घरात घुसून दाम्पत्याला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च उपक्रम; 350 हून अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद  //  अंतर्लीत ‘ऑपरेशन बिबट्या’ यशस्वी! वन विभागाच्या तत्परतेने बिबट्याला जीवदान  //  वीजबिलांचे तोरण बांधून महावितरणचा निषेध; शिरपूर फर्स्टचे आंदोलन  //  आमोदे शिवारात सापाचा दंश; युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत  //  सीमा तपासणी नाक्यावर गोंधळ; शासकीय कामात अडथळा, एकावर गुन्हा  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अभिनव उपक्रम; प्रशिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा  //  कामाचा दिरंगाईचा फटका; खड्डे चुकवताना ग्रामसेवकांच्या कारचा अपघात

सावेरजवळ ट्रक उलटून भीषण आग; वाहतूक ठप्प

सावेर(प्रतिनिधी) शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाजवळ शुक्रवारी (१२ जून) सकाळी सुमारे ७ वाजेच्या सुमारास भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन उलटल्यानंतर त्याला भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली.


शिरपूरकडे येत असलेला ट्रक सावेर येथील रंधे यांच्या पेट्रोल पंपाजवळ उलटला. अपघातानंतर ट्रकला अचानक आग लागल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आगीची तीव्रता लक्षात घेता चालक व सहचालक यांच्या अवस्थेबाबत सुरुवातीला कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती.
घटनेमुळे शिरपूर-चोपडा मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली. माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासह वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!