हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिंगावे येथे घरात घुसून दाम्पत्याला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

शिरपूर : तालुक्यातील शिंगावे येथे किरकोळ वादातून घरात घुसून पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगावे येथील किरण कमलेश पाटील वय 31 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 9 जून रोजी सकाळी सुमारे 10 वाजेच्या दरम्यान त्यांच्या घराजवळ गोंधळ सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या बाहेर आल्या. त्यावेळी काही जण त्यांच्या पती कमलेश पाटील यांना शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी मारहाण करत असल्याचे दिसून आले.
फिर्यादीने पतीची सुटका करून त्यांना घरात नेण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी घरात घुसून दोघांनाही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची पोत तुटून नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मारहाणीदरम्यान जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत कमलेश पाटील जखमी झाल्याने त्यांच्यावर प्रथम शिरपूर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीनुसार पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
याप्रकरणी राजू भिल, भदू भिल, साहेबराव भिल आणि अमोल बडर सर्व रा. शिंगावे, ता. शिरपूर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!