हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

वीजबिलांचे तोरण बांधून महावितरणचा निषेध; शिरपूर फर्स्टचे आंदोलन

शिरपूर (प्रतिनिधी ) अवाजवी वीजबिले, शेतकऱ्यांना अपुरा वीजपुरवठा तसेच महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात शिरपूर फर्स्टच्या वतीने मंगळवारी शिरपूर येथील महावितरण (एमएसईबी) कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहरातील नागरिकांसह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना वापराच्या तुलनेत जादा वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ग्राहकांना कमी वापर असूनही हजारो रुपयांची वीजबिले देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांना नियमानुसार आठ तास वीजपुरवठा मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यामध्ये कपात होत असल्याने शेतीकामांवर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.


या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, चुकीच्या वीजबिलांची पडताळणी करून दुरुस्ती करण्यात यावी तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान नागरिकांनी अवाजवी वीजबिलांचे तोरण तयार करून ते महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शिरपूर फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण प्रशासनाला निवेदन सादर केले. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!