हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

सीमा तपासणी नाक्यावर गोंधळ; शासकीय कामात अडथळा, एकावर गुन्हा

शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील हाडाखेड येथील महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमा तपासणी नाक्यावर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून गोंधळ घातल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटार वाहन निरीक्षक किरण विलास लबुडे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ८ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास सीमा तपासणी नाक्यावर नियमित वाहन तपासणी सुरू होती. यावेळी राजस्थानमधील दोन मालवाहू वाहनांची वजन व कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती.


दरम्यान, सरोज पाटील हे तपासणी नाक्यावर आले. त्यांनी संबंधित वाहनांच्या तपासणीबाबत आक्षेप घेत कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच शासकीय कामकाजात हस्तक्षेप करून तपासणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर मोटार वाहन निरीक्षक लबुडे यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन पाटील करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!