पिक विमा योजनेचा लाभ घ्या; शेतकऱ्यांना आमदार पटेल-पावरा यांचे आवाहन  //  शिंगावे येथे घरात घुसून दाम्पत्याला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च उपक्रम; 350 हून अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद  //  अंतर्लीत ‘ऑपरेशन बिबट्या’ यशस्वी! वन विभागाच्या तत्परतेने बिबट्याला जीवदान  //  वीजबिलांचे तोरण बांधून महावितरणचा निषेध; शिरपूर फर्स्टचे आंदोलन  //  आमोदे शिवारात सापाचा दंश; युवकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत  //  सीमा तपासणी नाक्यावर गोंधळ; शासकीय कामात अडथळा, एकावर गुन्हा  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अभिनव उपक्रम; प्रशिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा  //  कामाचा दिरंगाईचा फटका; खड्डे चुकवताना ग्रामसेवकांच्या कारचा अपघात  //  घरफोडी प्रकरणाचा नरडाणा पोलिसांकडून उलगडा; तीन संशयितसह बालक ताब्यात

धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अभिनव उपक्रम; प्रशिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा

शिरपूर (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील क्रिकेट प्रशिक्षकांचे कौशल्य विकसित करून तळागाळातील क्रिकेटला चालना देण्याच्या उद्देशाने धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डी.डी.सी.ए.) आणि श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (एस.व्ही.के.एम.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ तांडे (ता. शिरपूर) येथील एस.व्ही.के.एम. संचालित मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील विविध भागांतील १०० हून अधिक प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक व क्रिकेटप्रेमींनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षकांचे तांत्रिक ज्ञान, प्रशिक्षण कौशल्य, नेतृत्व क्षमता आणि खेळाडू घडविण्याच्या आधुनिक पद्धतींची माहिती देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षणासाठी मुंबईतील नामांकित क्रिकेट तज्ज्ञ व मार्गदर्शक संपत ठोंबरे, डॉ. विजय टांडळेकर, नितीन खाडये आणि नितीन राणे उपस्थित होते. त्यांनी आधुनिक क्रिकेट प्रशिक्षण तंत्रज्ञान, खेळाडू विकास प्रक्रिया, फिटनेस व कंडिशनिंग, क्रीडा विज्ञान तसेच प्रशिक्षकांच्या बदलत्या भूमिकांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
उद्घाटन समारंभाला धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा एस.व्ही.के.एम.चे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, डी.डी.सी.ए.चे सचिव प्रितेश पटेल, उपाध्यक्ष विक्रम राठोड, संयुक्त सचिव दाबीर शेख, सदस्य अरविंद किलेदार, प्रा. मराठे, संजय जगताप, मुख्य प्रशिक्षक फिरोज शेख, शाळेच्या प्राचार्या मंजू सिंह तसेच एस.व्ही.के.एम.चे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. किरण अंचन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नव्या लोगोचे अनावरण. नव्या लोगोमधून असोसिएशनची व्यावसायिकता, उत्कृष्टता आणि जिल्ह्यातील क्रिकेट प्रतिभेला प्रोत्साहन देण्याची बांधिलकी अधोरेखित करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षक शिक्षणाचे महत्त्व विशद करताना, दर्जेदार प्रशिक्षक घडल्यासच सक्षम आणि गुणवत्तापूर्ण क्रिकेटपटू निर्माण होऊ शकतात, असे मत व्यक्त केले. जिल्ह्यातील प्रशिक्षक व खेळाडूंना सातत्याने शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिके, वर्गखोल्यांतील तांत्रिक सत्रे, फिटनेस मॉड्यूल्स आणि परस्परसंवादी चर्चांद्वारे प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून जिल्ह्यात पात्र क्रिकेट प्रशिक्षकांचे मजबूत जाळे उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!