हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खत वितरणात गैरप्रकार सहन केला जाणार नाही:-विशाल मोटे,नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

शिरपूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात खते उपलब्ध व्हावीत, यासाठी खत वितरण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक विशाल मोटे यांनी दिला. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
शिरपूर पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीपपूर्व नियोजन बैठक व ‘साथी’ पोर्टल हाताळणीबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना मोटे बोलत होते. निर्धारित मर्यादेपेक्षा युरियाच्या बॅगची विक्री झाल्यास त्याची तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खत वितरणातील पारदर्शकता आणि शिस्त यावर भर देताना, ई-पॉस मशीनद्वारेच खत विक्री बंधनकारक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यासाठी उपलब्ध होणारा खतसाठा स्थानिक स्तरावरच विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार खत वाटप करणे आवश्यक असून, एका शेतकऱ्याला २० पेक्षा जास्त युरिया बॅग विक्री झाल्यास तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विक्रेत्यांना मिळणाऱ्या खतसाठ्याची मोजणी संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच करणे बंधनकारक राहणार आहे. शेतकऱ्यांसाठी असलेला खतसाठा औद्योगिक किंवा अन्य अकृषी वापरासाठी वळवू नये, यासाठी प्रशासन सतर्क असून, जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मोटे यांनी दिला.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास गोपाळ यांनी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करताना शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले. बैठकीस तालुक्यातील शिरपूर तालुका सीड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशन चे अध्यक्ष हेमंत चौधरी, उपाध्यक्ष गौरव गोयल, सचिव भूपेश अग्रवाल, खजिनदार निलेश अग्रवाल, जितेंद्र पाटील, ललित राजपूत, नागराज पाटील, नामदेव धनगर, जितेंद्र जैन,डी एन बडगुजर, संजय पाटील, उज्वल निकम ,गोपाल जाधव ,जगदीश पाटील लक्ष्मण पाटील यांच्यासह तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!