शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप  //  मुकेशभाई पटेल सैनिक स्कूलचे खेळाडू जिल्हा बास्केटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा जिल्हा अजिंक्य  //  खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई  //  पुणे जिल्ह्यातील अत्याचार घटनांवर संताप; डॉक्टरांवर कारवाईची मागणी  //  शिरपुरात माता मृत्यूने खळबळ; बाळंतपणानंतर 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू  //  तालुक्यातील वन जमीन धारक आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मंजूर;आ.अमरीशभाई पटेल यांच्या प्रयत्नांना यश  //  शिरपूरजवळ रिक्षा पलटी; एकाचा मृत्यूशिरपूर : तालुक्यातील साकवद–बाळदे  //  धुळे जिल्हा क्रिकेट संघाच्या 16 वर्षाखालील संघाची दिमाखदार कामगिरी   //  आमदार अमरिशभाई पटेल यांची दूरदृष्टी ठरली जलक्रांतीची दिशा…!  //  शस्त्रक्रियेत धक्कादायक हलगर्जी; महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा आरोप, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा

शिरपूरात गरजूंसाठी शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व तिनचाकी सायकलींचे वाटप

शिरपूर : गरजू नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिरपूर येथे विविध उपयुक्त साधनांचे वाटप करण्यात आले. आमदार काशिराम दादा पावरा यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला. अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या सहकार्याने तसेच पंचायत समितीच्या २० टक्के शेष निधीतून आणि दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधीतून कार्यक्रम राबविण्यात आला.
चोपडा जीन परिसरातील आर.सी. पटेल आश्रम शाळेच्या प्रांगणात झालेल्या या वितरण सोहळ्यात ५७ महिलांना शिलाई मशीन, ५७ लाभार्थ्यांना पिठाच्या गिरण्या तर ४३ दिव्यांगांना तिनचाकी सायकली देण्यात आल्या. कार्यक्रमाला नागरिक, लाभार्थी व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी आमदार पावरा यांनी सांगितले की, पंचायत समितीची अधिकृत समिती नसतानाही पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना शासन योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अस्तित्व फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीनसह प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच गरजू कुटुंबांना पिठाच्या गिरण्या देऊन त्यांच्या दैनंदिन खर्चात बचत व उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फाउंडेशनच्या ‘एक मुठ्ठी अन्न’ योजनेद्वारे गरजू कुटुंबांना मदत केली जात असून जलसंधारण, बंधारे उभारणी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यही दिले जात आहे. कार्यक्रमात दिव्यांगांसाठी दिलेल्या तिनचाकी सायकलींमुळे त्यांच्या हालचाली सुलभ होऊन स्वावलंबन वाढणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन टेलर यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!