हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खरेदीखताची नक्कल देण्यासाठी १० हजारांची मागणी; ४ हजार घेताना एसीबीची कारवाई

धुळे:- खरेदीखत व सूची क्र. ०२ ची प्रमाणित नक्कल देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या खासगी इसमाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई चाळीसगाव येथे करण्यात आली.
तक्रारदार हे चाळीसगाव येथील रहिवासी असून त्यांच्या प्लॉटसंदर्भातील कागदपत्रांची प्रमाणित नक्कल मिळविण्यासाठी त्यांनी संपर्क साधला होता. त्यावेळी सुनील शिवदास निकम (वय ४७, रा. चाळीसगाव) याने नक्कल देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ५ हजार रुपये आधीच स्वीकारण्यात आले होते.
तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी धुळे येथील एसीबीकडे तक्रार केली. पथकाने पडताळणीनंतर सापळा रचला. त्यावेळी आरोपीने उर्वरित ४ हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन सांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल यांच्यासह पथकातील कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, चंद्रकांत सैंदाणे, रेश्मा परदेशी, सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
दरम्यान,शासकीय कामासाठी कोणीही लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!