शिरपूर / धुळे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांच्या वतीने 16 वर्षाखालील आंमत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे दि. 17 ते 30 एप्रिल दरम्यान नाशिक येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत धुळे जिल्हा संघाने दिमाखदार कामगिरीची नोंद केली.
आय गटात धुळे जिल्हा सोबतच विजय क्रिकेट क्लब पुणे, झोराष्ट्रीयन क्रिकेट क्लब पुणे, सहारा क्रिकेट क्लब पुणे तसेच हिंगोली व सांगली जिल्हा संघांचा समावेश होता. साखळी पध्दतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात विजय क्रिकेट क्लब पुणे विरुद्ध 10 गड्यांनी पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सामन्यात सांगली जिल्हावर 7 गडी राखून विजय मिळविला. तिसऱ्या सामन्यात हिंगोली जिल्हावर एक डाव व 32 धावांनी मोठा विजय मिळविला. चौथा सामना झोराष्ट्रीयन क्रिकेट क्लब पुणे विरुद्ध अनिर्णित ठरला. शेवटच्या पाचवा सामन्यात सहारा क्रिकेट क्लब पुणे विरुद्ध 66 धावानी विजय मिळविला.याप्रमाणे धुळे जिल्हा संघाने 3 सामन्यात निर्णायक विजय, 1 सामना अनिर्णित व 1 सामन्यात पराभव अशी कामगिरी केली. आय गटात धुळे जिल्ह्याने एकूण 21 गुण प्राप्त करून पुढील सुपर लीग फेरीसाठी आपली दावेदारी भक्कम केली.
धुळे संघातर्फे संपूर्ण स्पर्धेत पनव अग्रवाल याने 284 धावा केल्या व 14 बळी बाद केले. देवेन वाघ याने 196 धावा केल्या व 19 गडी बाद केले. सोहम चौधरी याने 151 धावा व 11 बळी बाद केले. अनिकेत माळी याने 13 गडी बाद केले. तसेच इतर खेळाडूनी त्यांना उत्तम साथ दिली. महत्वाचे म्हणजे, पनव अग्रवाल याची 125 धावांची शतकीय खेळी, देवेन वाघ याचे एका डावात तब्बल 8 बळी व सोहम चौधरी याची निव्वळ 27 चेंडूत नाबाद 72 धावांची वेगवान खेळी स्पर्धेचे खास वैशिष्ट्ये ठरले.
उत्तम कामगिरी करणाऱ्या धुळे जिल्हा संघात पनव कमलेश अग्रवाल (कर्णधार शिरपूर), देवेन विजय वाघ (उपकर्णधार धुळे), तेज गुलाब पाटील, अनिकेत मनोहर माळी, जिग्नेश गोपाळ जाधव, ओम राजेश पाटील, अनिकेत प्रल्हाद माळी, नैतिक महेंद्र चौधरी (सर्व रा. शिरपूर), रोनित ललित आरुजा, सोहम प्रविण चौधरी, सौरव राजेंद्र वाघमारे, प्रथमेश दिनेश गांगुर्डे, राम सुरेश बाविस्कर, सार्थक भूपेश पाटील (सर्व रा. धुळे), सिध्दांत संदिप पाटील (साक्री), राखीव जयहंस दिपक गिरासे (दोंडाईचा), सुदर्शन गोविंदराव पाटील (शिरपूर), फैजान बिलाल शेख (धुळे) मुख्य प्रशिक्षक फिरोज शेख, सहा. प्रशिक्षक आनंद जगताप यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
दिमाखदार कामगिरी करणाऱ्या जिल्हा संघाचे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अभिनंदन केले.