शिरपूर / महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे 2025 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास शिरपूर येथील तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शहर पोलीस ठाण्याचे पीएसआय हेमंत खैरनार यांनी पोलीस दलातर्फे राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाला प्रांताधिकारी डॉ.शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप पवार आदी मान्यवरांसह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.
