हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बारावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार

मुंबई /- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, शनिवार दिनांक २ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
यंदा राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला या शाखांमधून बारावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात होती. अखेर मंडळाने निकालाची तारीख जाहीर केल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला आसन क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) टाकावे लागणार आहे. तसेच विविध अधिकृत वेबसाइट्सवरही निकाल उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी शनिवार, 2 मे रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. 
दरम्यान, निकालानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची (Marksheet) छापील प्रत त्यांच्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातून पुढील काही दिवसांत मिळणार आहे. पुनर्मूल्यांकन (Revaluation) आणि पुनर्पडताळणी (Verification) प्रक्रियेबाबतची माहितीही लवकरच मंडळाकडून जाहीर केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांनी निकाल पाहताना घाईगडबड न करता अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.

hsc #hscresults #hscresults2026 #result #maharashtra

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!