हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर; चार सरपंच,एक सदस्य विजयी

शिरपूर : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि.२९) जाहीर करण्यात आला. चार ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदासाठी तर एका ग्रामपंचायतीत सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. मतदान सोमवारी (दि.२८) पार पडले होते.
थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत खर्दे ग्रामपंचायतीत माजी सरपंच भरत लोटन गुजर यांनी १२२४ मते मिळवत विजय मिळविला. चांदसे ग्रामपंचायतीत कलाबाई तात्या पावरा यांनी ६४२ मते मिळवून थेट सरपंचपद पटकावले.
तऱ्हाड कसबे ग्रामपंचायतीत तुकाराम संतोष कोळी यांनी ७०६ मते मिळवत विजय संपादन केला. पनाखेड ग्रामपंचायतीत संगीता नरेश पावरा यांनी ५४९ मते मिळवून सरपंचपदावर निवड झाली.
भोईटी ग्रामपंचायतीतील सदस्य पदाच्या निवडणुकीत सुरेश भोग्या पावरा यांनी १९४ मते मिळवत विजय मिळविला.
दरम्यान, काही ग्रामपंचायतींमध्ये सदस्य पदासाठी बिनविरोध निवडही झाली. अजनाड येथून महेंद्र सीताराम हाके, खर्दे खुर्द येथून भुऱ्या तोताराम भील, टेंभेपाडा येथून गुंजाऱ्या उदया पावरा, तोंदे येथून सरलाबाई धनराज पाटील, मांजरोद येथून मोतीलाल पांडुरंग पाटील, उमर्दा येथून इंद्रसिंग कातिलाल वळवी, लौकी येथून मनोज सुरसिंग भील तसेच बुडकी येथून माया ग्यानसिंग पावरा हे सदस्य बिनविरोध निवडून आले.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!