हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,आ.अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांचे आवाहन

शिरपूर : शिरपूरसह उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना कमीत कमी दरात प्रभावी व अत्याधुनिक उपचार मिळावेत असे आमच्या वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण क्षमतेने प्रयत्न करुन अतिभव्य अशा 1200 बेडच्या हॉस्पिटलची निर्मिती केली आहे.  या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहत आहेत, हे भूषणावह असून तालुक्यातील जनतेने आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज मैदानावर आयोजित जाहीर सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिलला एसव्हीकेएमच्या तपनभाई पटेल हॉस्पिटलसह विविध वास्तूंचे उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी 23 एप्रिलला सायंकाळी जनक व्हिला येथे हिरवळीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.
माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्षा संगीता देवरे, भाजपचे नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी, लक्ष्मण पाटील, नरेंद्रसिंह सिसोदिया, कैलासचंद्र अग्रवाल, काशीनाथ माळी, दिलीप लोहार, रज्जाक कुरेशी, सुभाष कुलकर्णी, पिंटू शिरसाठ, अनेक मान्यवर उपस्थित होते.
आमदार अमरिशभाई पटेल म्हणाले की, आमचे वडील कै.रसिकलाल पटेल यांनी सामान्य माणसाच्या आरोग्याविषयी नेहमीच कळकळ व्यक्त केली. त्यांची स्वप्नपूर्ती म्हणून हे हॉस्पिटल उभारले असून ते शिरपूरचे आरोग्य वैभव ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. भूपेशभाई म्हणाले की, ज्यावेळी तालुक्याच्या विकासकामांसाठी  मदतीचे आवाहन केले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदतनिधी उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शिरपुरात विविध विकासकामे उभारणे शक्य झाले.या बैठकीचे सूत्रसंचालन सुभाष कुलकर्णी यांनी तर बबनभाऊ चौधरी यांनी प्रास्ताविक केले.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!