शिरपूर : येथील एच.आर.पटेल फार्मसी महाविद्यालयात दहेज (गुजरात) येथील अजंता फार्मा कंपनीच्या वतीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संवाद साधण्याची तसेच करिअरच्या विविध संधी मिळवण्याची मौल्यवान संधी प्राप्त झाली.या प्लेसमेंट ड्राइव्हसाठी अजंता फार्माकडून धवल पटेल (एचआर) व सुधीर सिंग (प्रॉडक्शन मॅनेजर) उपस्थित राहून त्यांनी संपूर्ण निवड प्रक्रिया पार पाडली.विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व आत्मविश्वासाने सहभाग नोंदविला.
निवड प्रक्रियेत स्वराज भालकर, तुषार धनगर, प्रशांत सोनवणे, कोमल भामरे, महेश शिगणे, वृषाली हाडपे या सहा विद्यार्थ्यांची दरमहा १६,००० रुपये नोकरीसाठी निवड करण्यात आली, तसेच तेजस सतीश बागल, प्रतीक राजू कोल्हे,लखन जगदीश धनगर,आकाश जिजाबराव गाढरी आणि मनीष विष्णू गवळी या पाच विद्यार्थ्यांना दरमहा ५,००० रुपये स्टायपेंडसह उन्हाळी इंटर्नशिपची संधी देण्यात आली.
या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून त्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि अशा संधींचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करत उद्योग व शिक्षण यामधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.अजंता फार्मा प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या ज्ञान,संवाद कौशल्य व व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक केले.
या उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. एस. बी. बारी आणि प्लेसमेंट प्रमुख डॉ. व्ही. के. चटप यांनी अजंता फार्मा कंपनीचे आभार मानून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.सदर निवडीबद्दल संस्थाध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल,कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल,नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल,उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,सचिव सौ.रेषा पटेल,सर्व संचालक,प्राचार्य डॉ.एस.बी.बारी यांनी अभिनंदन केले.