हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कुलरच्या विजेच्या धक्क्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील होळनांथे येथील एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा कुलरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळनांथे येथील गोविंदा वामन मराठे यांचा नातू हर्षल विनोद मराठे (वय १६) हा नुकताच दहावीची परीक्षा देऊन घरी अभ्यास करत होता. दरम्यान, दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास त्याचा हात घरातील कुलरला लागला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्या वेळी घरात अन्य कोणीही नसल्याने त्याला तातडीची मदत मिळू शकली नाही. यातच त्याचा मृत्यू झाला.हर्षल हा अभ्यासू व होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अकाली निधनाने होळनांथे व अजंदे बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याच्या पश्चात आई-वडील व आजोबा असा परिवार आहे.दरम्यान, नागरिकांनी घरातील विद्युत उपकरणे वापरताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.


 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!