हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या ‘झेप २०२६’ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

शिरपूर : सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्थेमार्फत आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असून अत्याधुनिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आल्यानंतर मला मनापासून आनंद होत आहे. आपल्या शिक्षणाचा फायदा हा समाजातील शेवटच्या माणसाला देखील व्हायला पाहिजे. जी -पॅट, गेट, कॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देतांना माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयात ‘झेप २०२६’ या कार्यक्रमात जीपॅट, गेट व कॅट (सीएटी) या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते संपन्न झाला.एस. एम. पटेल ऑडिटोरियम हॉल येथे १८ एप्रिल रोजी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला.यामध्ये जीपॅटपरीक्षेत ८८ विद्यार्थी, गेट परीक्षेत ५१ विद्यार्थी तसेच कॅट (सीएटी) परीक्षेत २ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.या गुणगौरव सोहळ्यास शिरपूर एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेशा पटेल, खजिनदार बबनलालअग्रवाल, संचालक अतुल भंडारी, संचालक विजय भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, प्राचार्य डॉ. नितीन हासवानी, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, डॉ. सी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. हितेंद्र महाजन, सौ. डॉ. एस. डी. पाटील, डॉ. एस. एस. चालिकवार, डॉ. ए. पी. गोरले, डॉ. पंकज नेरकर, डॉ. आर. ओ. सोनवणे, डॉ. जयेश पाटील, डॉ. हारून पटेल, सौ. डॉ. मोनिका ओला आदी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी मनोगतात महाविद्यालयाच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचा आढावा अधोरेखित केला. तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक विकासासाठीच्या विविध उपक्रमाची आणि महाविद्यालयातील अत्याधुनिक सुविधांची  माहिती दिली. त्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.डॉ. हारून पटेल यांनी जीपॅट-२०२६, गेट आणि कॅट (सीएटी) या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती देऊन त्यांचे अभिनंदन केले.जीपॅट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना एम. फार्मसी तसेच इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळतो. यासोबतच भारत सरकारकडून दरमहा रुपये १२,४०० इतका स्टायपेंड दिला जातो. काही विद्यापीठांमध्ये जीपॅट पात्र विद्यार्थ्यांना पीएच.डी. साठी थेट प्रवेशाची संधी देखील उपलब्ध होते.यासोबतच गेट ही अभियांत्रिकी व विज्ञान शाखांसाठीची महत्त्वाची परीक्षा असून उच्च शिक्षण (एम. टेक.) व नामांकित संशोधन संस्थांमध्ये प्रवेशासाठी तिचे विशेष महत्त्व आहे. तसेच कॅट  ही देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांमध्ये (आय. आय. एम. एस  व इतर) एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणारी अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. या सर्व परीक्षांमध्ये यश मिळवणे हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे व मेहनतीचे प्रतीक मानले जाते.जीपॅट-२०२६ परीक्षेत ८८ विद्यार्थी उत्कृष्ट गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत. यात ४ विद्यार्थांनी देशातील पहिल्या १०० मध्ये स्थान पटकावले आहे. यात वीणा पाटील हिने ऑल इंडिया रँक ४१ वा प्राप्त केला आहे, श्रुती झा हिने ऑल इंडिया रँक ६४ वा प्राप्त केला आहे, तन्वी पवित्रकर हिने ऑल इंडिया रँक ८२ प्राप्त केला आहे  आणि जानवी बागुल हिने ऑल इंडिया रँक ९९ वा प्राप्त केला आहे.यात वीणा पाटील ३१२, श्रुती झा ३००, तन्वी पवित्रकर २९३, जानवी बागुल २९०, दुर्गेश सुर्यवंशी २८९, अक्षद सोनार २७८, ज्ञानेश्वर महाले २७८,  बालाजी येरपलवार २७६, पूजा गिरासे २७५, प्रज्वल थोटे २६६, गायत्री महाजन २५९, शेख अमीर २५७, दर्शन पाटील २५६, पूजा सोनवणे २५२,निखिल कचरे २५२, सायली शिंदे २५१, दिपक माळी २५१, दुर्गेश्वरी पाटील २५१, सार्थक बेडसे २४९, मिताली वंजारी २४७, सुदर्शन चौधरी २४६, गुंजन काठोके, २४३, देवाशिष दाते २४२, मनीष महाजन २३८, नॅन्सी कांबळे २३५, वैष्णवी बन्साली २३४, आदित्य पाटील २३४,  रोशन वाघ २३४, प्रशांत पाटील २३४, वैष्णवी भन्साळी २३४, तनुजा पाटील २३२, प्रतीक सोरटे २३१, आदित्य राजपूत २३०, अचल गोकलानी २३०, सानिका शुक्ला २३०, तुषार पाटील २२९, पुष्पक साळुंखे २२६, करण इंगळे २२५, जागृती काळे २२५, दर्शन पाटील २२४, अंकिता पाटील २२२. आरती वसमतकर २२१, प्रज्ञा सोनवणे २१८, सानिका वाघ २१४, तृप्ती पाटील २१३, मैथिली अग्रवाल २११, प्रगती दीक्षित २११, स्नेहा भेराडे २०९, शिवशंकर मालठाणे २०९, निखिल पगार २०७, कांचन नेरकर २०७, यज्ञी वाडिले २०६, आदित्य भालेराव २०६, विशाल महाजन २०६, नंदिनी खैरनार २०५, ओंकार भारती २०३, खुशाल गुरव २०२, गौरव बोदाडे २०२, तेजस रांजणे २०१,वैष्णवी साबे २०१, हिरालाल मराठे २००, प्रणव भोई २००, किरण माळी २००, श्रुती सेदानी २००, तेजस बोरसे १९९, चेतन पाटील १९८, श्रावण थेलकर १९८, वंश जैस्वाल १९६, खुशी वंजारी १९६, कुणाल पाटील १९०, कुणाल पवार १९०, अनामिका ठाकूर १८९, चेतन शिंदे १८८, रुतुजा पाटील १८६, अनिशा मोराणकर १८५, कांक्षिणी बागुल १८३, देवयानी ठाकरे १८३, मोईन काझी १८२, रुपाली सोनवणे १८१, गायत्री पाटील १८०, टीना राणे १८०, शंतनू माटे १७८, शुभम पाटील १७८, वरुण माळी १७७, जिग्नेश पाटील १७५, धनश्री शिंदे १६५, महेंद्र समशेर १५०, शुभम खराटे १४७, वैभव सोनवणे १३२ असे प्रत्येकी गुण प्राप्त झाले आहेत. गेट २०२६ महाविद्यालयातून एकूण ५१ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले  या परीक्षेत ऑल इंडिया रँक प्रमाणे अक्षद शामल सोनार हा १७२ वा, वैष्णवी राजेश भन्साळी हि ४७२ वी , आणि  गांगुर्डे मनिष राजेंद्र हा  ४४५ वा रँक आहे. यात ५१ विद्यार्थ्यांना मिळालेले गुण असे अक्षद शामल सोनार ७३५, वैष्णवी राजेश भन्साळी ६५७, गांगुर्डे मनिष राजेंद्र ६१२, पाटील आदित्य सुनील ५४०, दुर्गेश शशिकांत सुर्यवंशी ५३४, प्रणव चंद्रकांत सपकाळे ५१२, मिताली दिनेश वंजारी ४७३, प्रतीक सोमेश्वर सोरटे व ऋतुजा दिलीप पवार या दोघांना प्रत्येकी ४६७,  सुदर्शन विकास चौधरी ४५१, कौस्तुभ विलास पाटील ४४५, दीपक योगेश माळी, पुष्पक संभाजी साळुंखे, व यादनी मधुकर वाडिले या तिघांना  प्रत्येकी ४२८, दुर्गेश्वरी जयेश पाटील व शर्मा अंकित अजमेर या दोघांना प्रत्येकी ४२३, सोहम देशमुख ४१७, प्रज्वल संजय थोटे ४०६, मयुरी साहेबराव माली व प्रतिक दीपक चौधरी या दोघांना प्रत्येकी ३९०, प्रशांत सतीलाल पाटील ३८४, हर्षाली माधवराव गवळी ३६७, श्रुती हितेश सेडानी ३६२, गिरासे पूजा साहेबराव ३५६, यश विनोद शेवाळे व महाजन गायत्री सुनील या दोघांना प्रत्येकी ३५१, सोहम संजय मोरे ३३४, रोहित विजय शिंपी, गणेश अशोक सपकाळ व उर्वशी ईश्वर पाटील या तिघांना प्रत्येकी ३२८, गुंजन विनोद कथोके व प्रणव महेंद्र भोई या दोघांना प्रत्येकी ३१७, मानसी पाटील, नेहा अनिल वंजारी व तेजस सुधाकर बोरसे या तिघांना प्रत्येकी ३१२, निकेत गिंदोदिया ३०९,कल्याणी प्रकाश बोरसे ३०६, प्रणव दिपक निकम, राणी संजीव भावसार व वैभव सुनील डुकरे या तिघांना प्रत्येकी ३००, कोमल ज्ञानेश्वर पाटील, वीणा पारसनाथ पाटील, विशाखा रामराव पाटील, खांडू धोंडू नेरकर, व पाटील साक्षी अनिल या पाचही प्रत्येकी २९५, वंशिका अहिर २८९, रोशन विजय वाघ १७८, शुभम खराते १७२, वैभव सुनील डुकरे३००, वैष्णवी राजेश भन्साळी ३९०, गांगुर्डे मनिष राजेंद्र ३२०.तसेच कॅट २०२६ या परीक्षेत अमन चिरनिया यास ९८ आणि तुषार सूर्यवंशी यास ९२ पर्सेन्टाईल मिळाले. या परीक्षेच्या खास तयारी साठी डॉ.हरून पटेल यांनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयातील तज्ञाकडून अतिरिक्त व्याखानांचे आयोजन करण्यात आले. तसेच परीक्षेमधील वेळेच्या नियोजनाचा सराव म्हणून अनेक सराव परीक्षा घेतल्या गेल्या, ज्यामुळे या कठीण परीक्षेतही यश मिळवणे सोपे झाले, असे मत यशस्वी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक यश संपादन करण्यासाठी प्रेरणा दिली.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!