हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

क्राईम ब्लास्ट ब्रेकिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक-श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे बदली

धुळे : जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत गुन्हेगारीवर प्रभावी वचक निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
धिवरे यांनी आपल्या कार्यकाळात केवळ पोलिसी कामकाजापुरते मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्य विषयक उपक्रमांवरही विशेष भर दिला. विशेषतः ग्रामीण व आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांसाठी त्यांनी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. तसेच पशुधनासाठीही आरोग्य शिबिरे राबवून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
याशिवाय बेरोजगार युवकांसाठी पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरे घेऊन तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
धुळे जिल्ह्यात अनेक वर्षांनंतर सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व गुन्हेगारी नियंत्रण या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करणारा अधिकारी मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता नव्याने नियुक्त होणाऱ्या पोलीस अधीक्षकांकडूनही अशाच प्रभावी व लोकाभिमुख कार्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!