हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

“एक मुठ्ठी अनाज” उपक्रमातून शिरपूर येथे अस्तिव फाउंडेशन मार्फत १०३ गरजू कुटुंबांना मदतीचा हात

शिरपूर येथे अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत “एक मुठ्ठी अनाज” हा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या संचालिका सौ.द्वेता करण नथवाणी यांच्या संकल्पनेतून दि.१७ एप्रिल २०२६ रोजी खांडऱ्यागड पाडा (भोईटी) येथे गरजू व कष्टकरी कुटुंबांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत एकूण १०३ लाभार्थ्यांना धान्य किट, कपडे तसेच गृहोपयोगी भांडी देऊन मदतीचा हात देण्यात आला.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, अस्तित्व फाऊंडेशनच्या संचालिका सौ. कृतीबेन पटेल, एस.व्ही.के.एम. शिरपूर कॅम्पस इन्चार्ज सौ. रिटाबेन पटेल, उपनगराध्यक्षा सौ. संगीता देवरे, माजी समाजकल्याण सभापती कैलास पावरा, भोईटीचे सरपंच दीपक पावरा, खामखेडा सरपंच ऋषिकेश पावरा यांच्यासह फाउंडेशनच्या समन्वयक सौ. सोनिया भसीन, सौ. चारुलता पाटील, तसनिम जळगाववाला, सौ. मीनाक्षी राठी, सौ. दिव्या जैन, शिवा बंजारा, स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी तसेच फाउंडेशनची संपूर्ण टीम, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वर माळी यांनी केले. यावेळी सौ. सोनिया भसीन यांनी फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.“एक मुठ्ठी अनाज” ही संकल्पना सामाजिक जाणिवेतून सुरू करण्यात आली असून, शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढदिवशी एक मुठ्ठी धान्य शाळेत आणण्याचे आवाहन केले जाते. महिनाभर जमा झालेले हे धान्य एकत्र करून गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवले जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच सामाजिक जाणीव निर्माण होत असून, गरजूंना मदत करण्याचा संस्कार रुजवला जात आहे
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!