हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 25 एप्रिल रोजी उदघाटन

शिरपूर : तालुक्यातील आरोग्य सुविधांना नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा २५ एप्रिल २०२६ रोजी गाठला जाणार आहे. एस.व्ही.के.एम. संचलित तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या निमित्ताने शिरपूरात विविध विकासकामांचा धडाका पाहायला मिळणार आहे.

तालुक्यातील खर्दे बु.येथे उभारण्यात आलेले हे १२०० बेडचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्वसामान्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या टप्प्यात ३५० बेडसह सेवा सुरू होणार असून, विविध आजारांवर उपचार,जटिल शस्त्रक्रिया आणि नामांकित डॉक्टरांकडून सेवा उपलब्ध होणार आहे.

श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आ.अमरीशभाई पटेल आणि सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प साकार झाला आहे. या उद्घाटन सोहळ्यास मंत्री हसन मुश्रीफ, गिरीष महाजन, जयकुमार रावल, संजय सावकारे यांच्यासह धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा दौरा दुपारी ३ वाजता शिरपूर विमानतळावर आगमनाने सुरू होईल. त्यानंतर एस.व्ही.के.एम. इंजिनिअरिंग कॉलेज, विविध औद्योगिक प्रकल्प, नर्सिंग कॉलेज यांचे उद्घाटन व पाहणी करण्यात येणार आहे. सायंकाळी ५.०८ वाजता हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर, रात्री ७ वाजता आर.सी.पटेल फार्मसी कॉलेज मैदानावर जाहीर सभा होणार आहे. यावेळी स्टेजवरुन वर्च्युअल यंत्रणेद्वारे तरडी येथील ॲग्रीकल्चर कॉलेज व फॉर्मसी कॉलेज,निमझरी नाक्यावरील आर.सी.पटेल इंग्लिश मेडियम स्कूलचे उदघाटन होईल.तसेच नटवाडे येथील देवमोगरा माता मंदिर, दहिवद येथील, इंटरनॅशनल मोटर ड्रायव्हींग स्कूलचे दहिवद येथील भूमिपूजन होणार आहे.

शिरपूर शहरातील अरुणावती नदीकाठावरील या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून, हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!