हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

करवंद येथे स्वामिनारायण मंदिरात २० ते २२ एप्रिल रोजी मूर्ती प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन

शिरपूर : तालुक्यातील करवंद येथील बी.ए.पी.एस. श्री स्वामिनारायण मंदिरात नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात ‘मूर्ती प्राण प्रतिष्ठा महोत्सव’ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
परम पूज्य प्रमुखस्वामी महाराज आणि प्रगट ब्रह्मस्वरूप गुरूहरी महंतस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हा मंगलमय सोहळा आयोजित करण्यात आला असून, परिसरातील सर्व भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महोत्सवाची सुरुवात २० एप्रिल २०२६, सोमवार रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भव्य नगर यात्रा (शोभायात्रा) ने होणार आहे. २१ एप्रिल २०२६, मंगळवार रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत मूर्ती प्रतिष्ठा महायज्ञ आयोजित करण्यात आला असून, त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
२२ एप्रिल २०२६, बुधवार रोजी सकाळी ८ वाजता मूर्ती प्रतिष्ठेची मुख्य विधी पार पडणार असून, सकाळी १० वाजता सत्संग सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी दुपारी १२ वाजता सर्व उपस्थितांना महाप्रसादाचा लाभ दिला जाणार आहे.
या महोत्सवात पूज्य अक्षरचरण स्वामी (संत प्रशिक्षण केंद्र, सारंगपूर) तसेच पूज्य आनंदजीवन स्वामी (धुळे मंदिर) यांच्यासह माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी जि.प.अध्यक्ष देवेंद्र पाटील व अनेक मान्यवर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
अक्षर-पुरुषोत्तम महाराज आणि गुरूहरी महंतस्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन बी.ए.पी.एस. स्वामिनारायण सत्संग मंडळ, करवंद यांच्या वतीने करण्यात आले आहे
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!