नंदुरबार (प्रतिनिधी)- नवापूर MIDC परिसरात बिबट या वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात वन विभाग व WCCB मुंबईच्या संयुक्त पथकाला यश आले आहे. या कारवाईत पाच संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात वन्यजीव अवयवांची जप्ती करण्यात आली आहे.

