हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

परशुराम जयंतीपूर्वी शिरपूरात भार्गव यात्रेचा उत्साही जल्लोष

शिरपूर : भगवान परशुराम जयंतीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या भार्गव यात्रेचे शिरपूरमध्ये उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. सकल ब्राह्मण समाजासाठी श्रद्धेचा विषय असलेली ही यात्रा अहिल्यानगर येथून प्रारंभ होऊन मध्य प्रदेशातील जानापाव या भगवान परशुरामांच्या जन्मभूमीकडे प्रस्थान करत आहे.
या यात्रेदरम्यान विविध शहरांमध्ये थांबे घेत समाजबांधवांशी संवाद साधला जात असून धार्मिक एकात्मतेचा संदेश दिला जात आहे. शिरपूर येथे राजस्थानी गौड ब्राह्मण समाज व विप्र फाउंडेशनच्या वतीने परशुराम रथाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष केतन पंडीत यांच्यासह विजय देशपांडे, अनंत कुलकर्णी, हर्षल पंडीत, किशोर दलाल, अतुल शुक्ल, किशोर पंडीत, मनीष शर्मा, बापू पाटील, बब्बू शर्मा, प्रशांत शर्मा आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल केतन पंडीत यांचा सन्मान करण्यात आला. तसेच भगवान परशुरामांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!