हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

होळनांथे येथील आर.सी.पटेल सीबीएसई स्कूलचा १०० टक्के निकाल,दिगविजयसिंग राजपूत प्रथम

शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित तालुक्यातील होळनांथे येथील आर. सी. पटेल इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत शाळेचा लौकिक उंचावला.विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
दिगविजयसिंग नंदलालसिंग राजपूत (रा. होळनांथे) याने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. दिव्यानी योगराज पाटील (रा. घोडसगाव) हिने ९२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, प्रेरणा शशिकांत सूर्यवंशी (रा. अजनाड बंगला) ९१ टक्के गुण व हितेश बाळू पाटील (रा. दगडी) यांनी प्रत्येकी ९१ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेशा पटेल, सर्व संचालक, प्राचार्या भूमिका गर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्राचार्या भूमिका गर्ग यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या चिकाटी, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला दिले. तसेच भविष्यातही शाळा अशाच प्रकारे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या उल्लेखनीय निकालामुळे स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपली भक्कम ओळख पुन्हा अधोरेखित केली असून परिसरात सर्वत्र विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!