हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात संवाद सत्रात आदिवासी बांधवांच्या समस्या मंत्र्यांसमोर; उपाययोजनांचे आश्वासन

शिरपूर : प्रतिनिधी /- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत शिरपूरात आयोजित “संवाद सत्रात” तालुक्यातील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी डॉ. हिरा पावरा व अन्य पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन मंत्री उईके यांना प्रत्यक्ष सादर केले.

या संवाद सत्रात महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन (MADA), जयस महाराष्ट्र शिरपूर, समुदाय आरोग्य अधिकारी संघटना महाराष्ट्र, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तसेच शिरपूर तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान आदिवासी भागातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना इतर प्रवर्गातील अधिकाऱ्यांप्रमाणे ‘हार्ड एरिया अलाउन्स’ (दुर्गम क्षेत्र भत्ता) लागू करण्याची मागणी करण्यात आली.तसेच क्रांतिवीर खाज्या नायक स्मारक, आदिवासी क्रांतिवीर संग्रहालय उभारणी आणि बाटवापाडा येथील समाधीस्थळाच्या विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.बोराडी हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जात असले तरी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा नसल्याने तेथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह मंजूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.याशिवाय, शिरपूर तालुका आदिवासी बहुल असूनही सामूहिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र आदिवासी भवन नसल्याने अशा भवनाची तातडीने मंजुरी देऊन उभारणी करण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

 

मंत्री उईके यांनी सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांमार्फत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!