शिरपूर : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले जयंती तसेच क्रांतीवीर खाज्या नाईक स्मृती दिन ११ एप्रिल २०२६ रोजी शिरपूर येथील आमदार कार्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.कार्यक्रमास आमदार काशिराम पावरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात येऊन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करून या महान व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहिली.
आपल्या मनोगतात आमदार काशिराम पावरा म्हणाले की, महात्मा ज्योतीराव फुले यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष समानतेसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा व जातीय भेदभावाविरोधात लढा देत समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवला. तसेच क्रांतीवीर खाज्या नाईक यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी व स्वातंत्र्य संग्रामात दिलेले बलिदान हे प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचे स्मरण प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील व उपस्थित सर्व मान्यवरांनी देखील अभिवादन केले. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष ग्रामीण मंडळ अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरुपाल राजपूत, युवा मोर्चा अध्यक्ष करण शिंदे, चिटणीस संजय जाधव, दशरथ पाटील (विखरण), सरचिटणीस अजिंक्य शिरसाठ, राजेंद्र चौधरी (कळमसरे), किरण सिसोदिया, विश्वनाथ माळी (सरपंच, कळमसरे), पंडित पाटील, संदिप मालचे, सागर दोरीक, पंकज पवार, जगदीश थोरात, राकेश साळवे, अनिल सोनवणे, रोहित माळी, बापू कोळी, सुनिल मगरे, कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी व उत्साही होते. उपस्थितांनी महात्मा फुले आणि खाज्या नाईक यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.