हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अस्तित्व फाऊंडेशनतर्फे शिरपुरात जनक व्हीला येथे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी

शिरपूर येथे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या अस्तित्व सोशल वेलफेअर फाऊंडेशनतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सौ. द्वेता पटेल नथवाणी यांच्या संकल्पनेतून दि. ४ एप्रिल २०२६ रोजी जनक विला येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात एकूण ४० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीत ३६ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. यापैकी ३० रुग्णांना पुढील उपचारासाठी दि. ६ एप्रिल २०२६ रोजी नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
विशेष म्हणजे, या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असून शस्त्रक्रियेनंतर ३० दिवसांनी त्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या उपक्रमात फाऊंडेशनच्या संचालिका सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, समन्वयक सौ. सोनिया भसीन, स्वीय सहाय्यक सुनील जैन, योगेश्वर माळी, गोपाल माळी तसेच फाऊंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.
अस्तित्व फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून ‘मोतीबिंदू मुक्त शिरपूर’ हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!