हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

नांदेड येथील आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे जिल्हा फुटबॉल संघ रवाना

शिरपूर : धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशन (विफा) चा वरिष्ठ पुरुष (सिनियर मेन्स) संघ नांदेड येथे आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहात रवाना झाला आहे. या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना विफा जिल्हाध्यक्ष तथा शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या यशासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच शुभेच्छा देत त्यांचे मनोबल उंचावले.
शिरपूर येथील ‘जनक विला’ आमदार कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांनी संघातील सर्व खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खेळाडूंना “खेळामध्ये शिस्त, चिकाटी आणि संघभावना या गुणांना सर्वाधिक महत्त्व आहे, जिल्ह्याचे नाव उंचावण्यासाठी प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी करावी,” असे सांगत त्यांचे मनोबल उंचावले. तसेच स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी धुळे जिल्हा फुटबॉल संघ विफा जिल्हाध्यक्ष चिंतनभाई पटेल, सचिव संजय चौधरी, सदस्य दीपक पाटील, प्रशिक्षक मोहसीन शेख, टीम मॅनेजर अक्षय पाटील उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित केले.
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, मुंबई यांच्या वतीने आयोजित ही आंतरजिल्हा राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष फुटबॉल स्पर्धा दि. ७ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ दरम्यान नांदेड येथे होत आहे. या स्पर्धेत धुळे जिल्हा संघाने सहभाग नोंदविला असून, शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर. सी. पटेल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचाही संघात समावेश आहे.
धुळे जिल्हा संघात कर्णधार दीपक पाटील, उपकर्णधार रोहित अहिरे यांच्यासह देविदास सोनवणे, आकाश गायकवाड, निखिल माळी, अजय सूर्यवंशी, यश गायकवाड, पियुष शिंपी, अमन शेख, सचिन सोयते, हसनयन शेख, सार्थक जडे, भूषण चौधरी, नैनेश गायकवाड, आर्यन गांगुर्डे, प्रेम साळुंखे, आशिष बारेला, आर्यन देसले, शाहबाज खान आणि मोहम्मद शेख यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील क्रीडाप्रेमी नागरिकांकडून संघाला शुभेच्छांचा वर्षाव होत असून, या स्पर्धेत धुळे जिल्हा संघ उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!