हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळे एलसीबीची कारवाई; पिस्टल बाळगणारा शिरपूरचा युवक जेरबंद

धुळे : स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या कारवाईत वरवाडे येथील एका तरुणाला गावठी पिस्टल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्टल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
शिरपूरहून धुळेच्या दिशेने शस्त्रांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबी पथकाने नगावबारी शिवारात सापळा रचला. हॉटेल साईकिशन परिसरात संशयास्पद हालचाली करताना दिसलेल्या तरुणाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल व मॅगझीन जप्त करण्यात आले.
तसेच अंगझडतीदरम्यान त्याच्या खिशातून अंदाजे १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूसही आढळले. चौकशीत त्याने आपले नाव राहुल पांडुरंग पाटील रा. वरवाडे, ता. शिरपूर असे सांगितले.
याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक श्रीराम पवार पीएसआय चेतन मुंढे,पोहेकॉ पवन गवळी, आरिफ पठाण, राहूल सानप, देवेंद्र ठाकूर व मयूर पाटील यांच्या पथकाने केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!