हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यातील गिधाडे गाव स्मार्ट’ सुरक्षा कवचात! ३२ सीसीटीव्ही कमेऱ्यांचे लोकार्पण,ग्रामपंचायतीचा पुढाकार

तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनेने नागरिक हैराण असतांना तालुक्यातील
गिधाडे ग्रामपंचायतीने गावाच्या सुरक्षिततेसाठी एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबवत संपूर्ण गावाला सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणले आहे. तब्बल ३२ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, चोरीच्या घटनांना आळा घालणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा उपक्रम लोकसहभागातून उभारण्यात आल्याने त्याचे अधिक कौतुक होत आहे.
सरपंच डॉ. सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिधाडे येथील ‘नवदुर्गा मित्र मंडळ’ने सामाजिक जाणीव ठेवत मिरवणूक व डीजेवरील खर्च टाळून ग्रामपंचायतीला २० हजार रुपयांची देणगी दिली. त्यानंतर ‘पंचशील मित्र मंडळ’ने सीसीटीव्ही यंत्रणेसाठी आवश्यक असलेली महागडी कॅट-६ केबलची १० बंडल स्वखर्चाने उपलब्ध करून दिली.

यासोबतच गावातील रहिवासी योगेश ईनामदार यांनीही सामाजिक बांधिलकी जपत कमी दरात उच्च दर्जाचे कॅमेरे व एनव्हीआर उपलब्ध करून दिले. त्यामुळे गावात येणारे सर्व प्रमुख रस्ते, गल्ल्या आणि चौक या ठिकाणी कॅमेरे बसविणे शक्य झाले.
या उपक्रमामुळे गिधाडे गाव आता ‘स्मार्ट सुरक्षा’च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत असून, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या एकजुटीने उभा केलेला हा आदर्श इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!