शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद व जिल्हा परिषद शाळा चाकडू येथे आयोजित करण्यात आलेले एक्स-रे तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आपली तपासणी करून घेतली.
कोडीद येथील शिबिरात १०१ तर चाकडू येथे ११४ अशा एकूण २१५ नागरिकांनी एक्स-रे तपासणीचा लाभ घेतला. क्षयरोग संशयित व्यक्तींसाठी हे शिबिर विशेष उपयुक्त ठरले असून, लवकर निदानाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राष्ट्रपाल अहिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राकेश पावरा,जिल्हा पर्यवेक्षक उमेश आखाडे, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक धनराज पवार, छत्रसिंग राजपूत, श्रीमती विसपुते मॅडम धुळे, श्रीमती ललिता लोखंडे TBHV शिरपूर उपरोक्त सर्व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व पर्वेक्षक यांच्या सहकार्याने संपूर्ण तपासणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.
शिबिरासाठी आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा, आरोग्य सेवक सागर पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, फत्तेपूर गटप्रवर्तक सुनंदा पावरा व तेथील आशा सेविका व सर्व आशा सेविका, आरोग्य कर्मचारी व स्थानिक कार्यकर्त्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. हिरा पावरा यांनी “होय, आम्ही क्षयरोगाचा अंत करू शकतो!” या संदेशातून नागरिकांना तपासणीचे महत्त्व पटवून दिले.यावेळी दोन्ही ग्रामपंचायतींनी ‘टीबी मुक्त ग्रामपंचायत’ करण्याचा संकल्प करत आरोग्य विभागाला पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली.शिबिराच्या यशस्वी आयोजना बद्दल तालुका आरोग्य पथकाचे आभार व्यक्त करण्यात आले.