हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अहिल्यापूर शिवारात वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

शिरपूर : तालुक्यातील अहिल्यापूर शिवारात वीज कोसळून दोन बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्री घडली. या घटनेत पळासनेर येथील शेतकरी निलेश केवलसिंग राजपूत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पळासनेर येथील शेतकरी निलेश राजपूत यांचे अहिल्यापूर शिवारात शेतजमीन असून गोवंश जनावरे बांधलेली असतात.2 एप्रिल रोजी झालेल्या विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसात शेतात अचानक वीज कोसळली. यात शेतीकामासाठी अत्यावश्यक असलेली बैलजोडी जागीच दगावली. ऐन शेतीच्या हंगामात ही घटना घडल्याने संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. बैलजोडी हीच शेतीची मुख्य ताकद असल्याने या नुकसानीमुळे त्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होणार आहे.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासन, पशुवैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाशी संपर्क साधून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेचा त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे उघड्यावर आलेल्या शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!