हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तऱ्हाडी विद्यालयास शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकडून प्रोजेक्टर भेट

शिरपूर : तालुक्यातील तऱ्हाडी येथील स्व. आण्णासो साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर सायन्स कॉलेजला नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या शिक्षक आमदार निधीतून प्रोजेक्टर भेट देण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावावा आणि अभ्यासक्रम अधिक परिणामकारक पद्धतीने समजावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
सदर प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता येणार असून बदलत्या अभ्यासक्रमातील संकल्पना अधिक सोप्या आणि आकर्षक पद्धतीने समजावून सांगणे शिक्षकांना शक्य होणार आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, प्रेझेंटेशन, व्हिडिओ लेक्चर्स यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे.
या प्रोजेक्टरचे वितरण शिरपूर तालुका समन्वयक संतोष आव्हाड, इंजिनिअरिंग कॉलेज नंदुरबारचे एचओडी विकास बोरसे, अनिल गायकवाड तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास तापी परिसर विद्या प्रसारक संस्था तऱ्हाडीचे अध्यक्ष सुभाष भामरे, संचालिका उज्वला भामरे, संचालक प्रशांत भामरे, मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांच्यासह शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आधुनिक शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!