हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

विहिरीत सापडलेल्या कुजलेल्या मृतदेहामागचे गूढ उलगडले; अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

धुळे – मोहाडी येथील इंडो कंपनी परिसरातील एका विहिरीत सापडलेल्या कुजलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने नात्यातील तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी मुख्य संशयीतसह त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

२७ मार्च रोजी संबंधित विहिरीत एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विद्रूप असल्याने ओळख पटवणे अवघड झाले होते. सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.दरम्यान, मृताच्या हातावर गोंदलेले नाव (टॅटू) हेच ओळख पटवण्याचे महत्त्वाचे धागेदोरे ठरले. त्यावरून मृताची ओळख रवि मालचे अशी पटली.
तपासादरम्यान समोर आले की, रवि मालचे याचे आरोपी बापू मालचे यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपीच्या मनात संताप साचला होता. अखेर १८ मार्च रोजी आरोपीने रवीवर दगडाने वार करून त्याची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने पत्नीच्या मदतीने मृतदेह जवळील विहिरीत फेकून दिला.दरम्यान, १८ ते २७ मार्च या कालावधीत मृतदेह विहिरीतच पडून होता. पोलिसांनी तांत्रिक तपास व चौकशीच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!