हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

चंद्रग्रहणाचा प्रभाव; श्री बिजासन देवी मंदिर १२ तास बंद

शिरपूर : मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील हजारो कुटुंबांची कुलस्वामिनी म्हणून श्रद्धास्थान असलेले श्री बिजासन देवी मंदिर मंगळवारी (ता. ३) चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सकाळी साडेसहा ते सायंकाळी पावणेसात या कालावधीत मंदिरातील दर्शन व पूजाविधी पूर्णपणे स्थगित राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली.
मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र–मध्य प्रदेश सीमेवर वसलेले हे मंदिर तीन राज्यांतील भाविकांसाठी प्रमुख श्रद्धास्थान मानले जाते. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे हजेरी लावत असतात. विशेषतः चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांची संख्या लाखांच्या घरात पोहोचते.
धार्मिक परंपरेनुसार ग्रहणकाळात मंदिरातील नियमित पूजा-अर्चा व दर्शन व्यवस्था बंद ठेवली जाते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ६.३० वाजल्यापासून सायंकाळी ६.४५ वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी बंद राहतील. या काळात कोणत्याही प्रकारचे दर्शन, नवसपूर्ती किंवा धार्मिक विधी पार पडणार नाहीत.
ग्रहण संपल्यानंतर शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येईल. भाविकांनी दिलेल्या वेळेची नोंद घेऊन गैरसोय टाळावी, तसेच बंद कालावधीत मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!