शिरपूर : येथील किसान विद्या प्रसारक संस्था,संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि धुळे जिल्ह्यातील पहिली व नाशिक विभागातील दुसरी अशी अत्याधुनिक रोबोटिक व एव्हिएशन लॅबचे शुक्रवारी (ता. २८) रोजी उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत तसेच धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकच्या संचालिका सीमाताई रंधे यांच्या वाढदिवसानिमित्त ही लॅब त्यांच्या शुभहस्ते उद्घाटित करण्यात आली.
कार्यक्रमाला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ.तुषार रंधे,संस्थेचे सचिव निशांत रंधे, खजिनदार आशाताई रंधे,शि.व.न.प. च्या उपनगराध्यक्ष सौ संगीता देवरे, संचालक व नगरसेवक रोहित रंधे, शशांक रंधे, हर्षवर्धन रंधे, विश्वस्त श्याम पाटील, डॉ. जितेंद्र चित्ते,संजय गुजर,नगरसेवक माधवराव पाटील, नगरसेविका वर्षा माळी,अनिता गोसावी, मुख्याध्यापिका सौ सारिका रंधे, सौ विद्या रंधे, सौ गौरी रंधे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुरेखा मिस्त्री व समन्वयक सागर वाघ तसेच संस्थेचे सर्व व्यवस्थापक, ए.ए.पाटील,सिताराम माळी,के डी बच्छाव, भैय्या माळी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


संस्थास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ अशा तीन गटांतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हरित ऊर्जा, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, जलसंवर्धन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), आरोग्य व स्वच्छता या समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेली मॉडेल्स व प्रकल्प विशेष लक्षवेधी ठरले. काही विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक वेशभूषेतून प्रभावी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पानपाटील व वंदना खैरे यांनी केले, तर आभार चंद्रकांत सोनार यांनी मानले. ही रोबोटिक व एव्हिएशन लॅब धुळे जिल्ह्यातील पहिली आणि नाशिक विभागातील दुसरी अशी अत्याधुनिक लॅब असल्याचा मान संस्थेला मिळाला आहे. संस्थेचे माजी विद्यार्थी मयूर प्रदीप बाविस्कर यांना NASAमार्फत शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे लॅब उभारणीस विशेष बळ मिळाले.
या उपक्रमाबद्दल परिसरातील पालक व नागरिकांकडून संस्थेचे अभिनंदन होत असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, संशोधनवृत्ती व नवोन्मेषाची प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे